भाग 4 - क्रीडाप्रेमी दादा (कबड्डी )
महाराष्ट्रामध्ये कबड्डी हा खेळ पूर्वीपासून खेळला जात आहे. महाराष्ट्रातील काही नेत्यांनी या खेळाचा प्रसार व प्रचार करण्यात कसलीही कमी भासू दिली नाही. त्या नेत्यांपैकी एक आहे मा. शरदचंद्र पवार. शरद पवार साहेब हे महाराष्ट्र कबड्डी असोसिएशन चे अध्यक्ष असताना त्यांनी कबड्डी या खेळाला देशातच नव्हे तर आशिया खंडात नेवून ठेवले.परंतू नंतर शरद पवार साहेब केंद्राच्या राजकारणात गेल्याने त्यांना या खेळाकरीता पुरेसा वेळ देता येत नसल्याने अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला. या नंतर अध्यक्ष पदाकरीता अनेक नावे आली पण सर्वांच एकमत झाल ते मा. अजितदादा पवार या नावावर.
अजितदादांनी अध्यक्ष पद स्विकारल्यानंतर सर्वात आधी या असोसिएशनची आर्थिक बाजू मजबूत करण्यावर भर दिला. विजयी संघातील प्रत्येक खेळाडूला दहा हजार रुपये देण्याचे चालू केले. त्याचबरोबर अजितदादांनी महाराष्ट्र कबड्डी असोसिएशनचे संस्थापक बुवा साळवी यांचा जन्मदिवस हा कबड्डी दिवस म्हणून चालू केला आणि या दिवशी कबड्डी स्पर्धेचे आयोजन करून विजेत्या संघास रोख स्वरुपात बक्षीस देण्याची व्यवस्था केली.
कबड्डी स्पर्धेस चालना मिळण्यासाठी दादांनी शिवशाही चषक चालू केला. या चषकाकरीता असलेला 25 लाखांचा निधी अपुरा पडत असल्याने तो दादांनी 50 लाखांचा निधी सरकार कडून मंजूर करून घेतला. तसेच कबड्डी व खो-खो खेळाकरिता देण्यात येणार्या निधी मध्ये कसलीही तडजोड केली जाणार नाही याचीही व्यवस्था करून ठेवली.
अजितदादांनी महाराष्ट्र कबड्डी असोसिएशनचे प्रशस्त असे मुख्यालय दादर, मुंबई येथे बांधुन घेतले. हे मुख्यालय पाहिल्यावर कबड्डी हा खेळ आता मागे राहिला नाही याची जाणीव करून देते असे भव्य-दिव्य मुख्यालय बांधण्यात आले आहे. पहिल्या महिला विश्वचषक कबड्डी स्पर्धेतील भारतीय संघातील महाराष्ट्रातील महिला खेळाडूस प्रत्येकी एक कोटी रुपयांचे तसेच प्रशिक्षकास पंचवीस लाखांचे बक्षीस देण्याची व्यवस्था दादांनी केली आहे. त्याचबरोबर शासकीय नोकरी मध्ये 5% जागा खेळाडूकरिता राखीव ठेवण्याचे काम दादांनी केले आहे.
अजितदादांनी जेव्हापासून महाराष्ट्र कबड्डी असोसिएशनच्या अध्यक्ष पदाची सूत्रे हातात घेतलीये तेव्हा पासून कबड्डी खेळाच्या प्रगतीचा आलेख उंचावत गेला आहे.

No comments:
Post a Comment